Powered By Blogger

कर्पूराचे जग हे

हे जग जे आहे कर्पूरासारखे,
एकदा जळाले की पुन्हा जळणार नाही,
माणूस आहे त्याला जलवणारी काडे-पेटी,
काड्या संपल्याशिवाय जळणे थांबणार नाही.

माणसाचे विचार जे, आपत्ती कडे ढळत चालले आहेत,
नक्कीच त्यासी तोट्याचे ठरेल. 
ज्या दिवशी या जगाचा अंत होईल,
त्या दिवशीच हे माणसाला कळेल.

या जगाचा जो निर्माणकर्ता होता,

त्याच्या हे लक्षात आले नाही.
की माणूस या जगाचे काय भयंकर करून ठेवेल,
त्याची काहीच चूक नाही.

माणूस येथे गुनेदार आहे,
त्यालाच दोषी धरून,
खरी चूक तर माणसाचीच आहे,
हे त्यासी यायला पाहिजे कळून.

हे जग जे आहे कर्पूरासारखे ,

एकदा जळाले की पुन्हा जळणार नाही,
माणूस आहे त्याला जलवणारी काडे-पेटी,
काड्या संपल्याशिवाय जळणे थांबणार नाही.
*thinking of the first verse during S.S. period*