Powered By Blogger

सिद्धांत कर्माचा

सिद्धांत हा कर्माचा
आहे नियम देवाचा
नियम चालतो हा न चुकता
असा हा सिद्धांत कर्माचा :

करेल जो एक भोगेल तेच
ह्यातून त्याची सुटका नाही
या जन्मात तर त्या जन्मात
नक्कीच तो जाणून पाही


या नियमास दुर्लक्ष करून
पश्चाताप होत राहील एकास
कर्मफळांचा अनुभव न घेऊन
न लाभे मोक्ष कधीही त्यास  

वाढत राहील कर्मांचा साठा
लवकर संपायचा मार्ग नाही
पुढे सरकत राहील जन्मांचा काटा
भोगू न शकल्यामुळे एकाच
वेळी 

माणसाच्या न्यायालयात होऊ शकेल अन्याय
देवाच्या न्यायालयात नाही असा पर्याय
म्हणून हा नियम निर्माण केला
विश्वात न्याय सदैव चालवायला 


या नियमास जो दुर्लक्ष करेल
त्याला हा नियम क्रूरच वाटेल
जो सौजन्याने हा नियम पाळेल
फक्त तोच या नियमास वरदान समजेल

ज्यास मोक्ष प्राप्ती हवी
त्याने चालावे मार्गांवर काही
नित्य नेमाने न ढळता चालावे
मार्ग असे हे अनुसरावे :
 
''अज्ञानी व्यक्तीचा मार्ग असावा मौनाचा
अजाणता असल्याने घडू शकतील चुका
आचार विचार सर्वांचे जाणावे
परिणाम त्यांचे त्याने नीट पहावे

सदाचार नि दुराचार फरक ओळखावे
करून असे सदाचार अवलंबावे
करावा समावेश दानाचा यात
चालताल हा मार्ग आपण आनंदात

जरी खुन्नस काढावीशी वाटली
आपण दाखवावा संयम
लक्षात ठेवा आपल्या मनी
खुन्नस काढेल हा नियम

या मार्गावर करावी क्रोधांची मनाई
जो पाडू शकेल एकास पातकांच्या बळी
असे करून एखादा राहू शकेल सुखी
कर्माच्या साखळीतून हे सुटण्याचे गुपित''


सिद्धांत हा कर्माचा
आहे नियम देवाचा
नियम चालेल हा न चुकता
असा हा सिद्धांत कर्माचा
Enrichment comes at only one cost ~ hard work.

परिपूर्ण मित्र

आपल्या आयुष्यात अनेक मित्र बनून जातात. या संदर्भात मित्र म्हणजे अर्थाथच माणूस. कोणत्याही माणसात काही चांगले गुण असतात, तर काही वाईट गुणही असतात. मित्रांशी दैनंदिन जीवनात बोलत असल्याने, संवाद साधत असल्याने, आपण त्यांच्यात असलेल्या चांगल्या वाईट गुणांना बऱ्यापैकी ओळखतो. बऱ्याच वेळेला आपण त्यांच्या वाईट गुणांकडे दुर्लक्ष करतो, जे केल्याने त्यांचे चांगले गुण जास्त दिसून येतात. पण कधी कधी सभोवताली अशी परिस्थिती निर्माण होते, ज्यात आपल्या मित्रांचे वाईट गुण दिसून येतात जे पाहून मनाला खुपते. या खुपण्याला आपण नकारात्मक दृष्टीने जर पाहत राहिलो, तर मनात "आपल्याकडे चांगले खरे मित्रच नाहीयेत, आपल्याला चांगला मित्र शोधायला हवा, आपल्याला चांगला मित्र मिळतच नाहीये" अशे विचार येउन मनाला उदास करू लागतात. माझ्या मित्राचे असेच काही झाले होते.
एकदा आम्हची सहज रोजची गपशप चालली होते, तेव्हा त्याने मला त्याचे उदास असल्याचे सांगितले. त्याच्याकडे चांगला 'परिपूर्ण' मित्र नव्हता, असे तो म्हणाला. त्याला थोडक्यात असे म्हणायचे होते की त्याच्याकडे असा मित्र नव्हता, कि जो चांगला वागणारा असेल, त्याला मदत करणारा असेल, त्याचे विचार नीट समझून घेणारा असेल, वगैरे वगैरे. तो म्हणाला कि त्याने असा मित्र शोधण्याचा प्रयत्न केला पण त्याला असा मित्र मिळालाच नाही. हे ऐकून मी त्याला म्हणालो कि असा 'परिपूर्ण' मित्र मिळणं अशक्य आहे. माणसात काही न काहीतरी अनिष्ट गुण असतातच, ज्यामुळे असा मित्र कितीही जरी शोधला तरी मिळणार नाही. मग मी त्याला ह्यावर एक इलाज सांगितला.
मी त्याला म्हणालो, "तुझ्या कडे खूप सारे मित्र असतील."
तो म्हणाला हो.
"तू त्यांच्यातले चांगले वाईट गुण ओळखलेच असतील."
तो परत म्हणाला हो.
"त्यांच्यातले वाईट गुण बाजूला कर आणि चांगल्या गुणांकडे लक्ष दे. हे सगळे चांगले गुण तू एकत्र कर आणि एक 'परिपूर्ण' मित्र बनव. ह्या मित्रात काहीच वाईट अनिष्ट गुण नसतील. हा बनेल तुझा परिपूर्ण मित्र, जो तुला कायम सुखी ठेवेल जसे त्याने मला सुखी ठेवले. तुला जर एखादी गोष्ट त्याला सांगायची असेल, तर त्याच्यातला विश्वासू गुण पहायचा आपल्या कोणत्या मित्रात आहे, ज्या मित्रात हा गुण तुला दिसेल त्या मित्राला तू ही गोष्ट सांगू शकशील."
असं सांगून मी त्याला एका नवीन मित्राशी ओळख करून दिली.
*आशुतोष*
Every soul has its impression on time, it's just some impressions are deeper than others.
A talent kept hidden is like a bud kept from blossoming and showing the world how beautiful it is from the outside.