कज्जलेण विना व्यर्था यथैव लेखनी तथा ।
प्रतिभा तु विना स्फूर्तिमुपयुक्ता न केवला ।।१।।
A pen with no ink is useless; similarly, talent alone is of no use without inspiration.
ज्याप्रमाणे शाईशिवाय लेखणी व्यर्थ आहे, त्याप्रमाणे स्फूर्ती विना फक्त प्रतिभा उपयुक्त नाही.
हिमांशुस्तेजसा सुर्यात् प्राप्य तेजश्चकासति ।
ज्ञानेन हि तथा भाति ज्ञानं प्राप्य शिशुर्गुरोः ।।२।।
The moon, receiving light from the sun, is adorned with luster; likewise, a child obtaining knowledge from a teacher is adorned by knowledge.
चंद्र सूर्यापासून तेज प्राप्त करून चमकतो, त्याप्रमाणेच गुरुपासून ज्ञान प्राप्त करून शिष्य शोभून दिसतो.
व्यक्तिः प्रशंसयातीव सद्गुणानुपलक्षयेत् ।
अशक्यं दुर्गुणान्नष्टुं शेष्यान्नु प्रमिता स्तुतिः ।।३।।
A person, if overtly praised, may pay more attention towards his good traits. As a result, he would ignore his bad traits and it will become impossible to get rid of them. Therefore, one should praise within a limit.
अति प्रशंसा केल्याने एखादी व्यक्ती तिच्या सद्गुणांकडे लक्ष देते. त्यामुळे तिच्या दुर्गुणांकडे दुर्लक्ष केले जाते व त्यांचा नायनाट करणं अशक्य होतं. म्हणून प्रशंसा प्रमाणात करावी.
सूर्यो प्रतिदिनमुदेति कोಽपि प्रकाशवितरणाद्विरुणद्धि ।
उद्योगवानेकाग्र आदर्शो दृढनिश्चयो नः ।।४।।
The sun rises every single day. Can anyone check the sun from spreading light? It is this diligent, devoted and determined sun who is our ideal.
सूर्य प्रत्येक दिवशी आकाशात उगम पावतो. कोणीही त्याला तेजाचे वितरण करण्यापासून अडवू शकत का ? असा हा उद्यमशील, एकनिष्ठ, दृढनिश्चयी सूर्य आपला आदर्श आहे.
धनिकः ज्ञायते केन
नेताधीशो वा केन प्रभवति ।
न केन लभते ज्ञानं
प्रहेलिकायामेवोत्तरम् ।।५।।
This verse is a riddle. What is a wealthy man known by? By what does a king or a leader become powerful? With what can knowledge not be obtained? The answer is in the riddle itself. (The first letter of the first question, the first letter of the second and the first letter of the third together make the answer. ध-ने-न that is, by money.)
हे चरण एक प्रहेलिका आहे. धनिकाला कशाने ओळखले जाते? नेता किंवा राजा कशाने प्रभावशाली होतो? कशाने ज्ञान मिळू शकत नाही? प्रहेलिकेमध्येच उत्तर आहे. (पहिल्या प्रश्नातील पहिले अक्षर , दुसऱ्या प्रश्नातील पहिले अक्षर व तिसऱ्या प्रश्नातील पहिले अक्षर मिळून उत्तर आहे ~ ध-ने-न ~ अर्थात पैशाने.)
राजगञ्जे किमस्ति च किं च वस्तुनोಽपि मूल्यं निश्चयति ।
भिक्षुना याच्यते किं सरलमेतासामस्त्युत्तरमेव ।।६।।
This verse is also a riddle. What is found in a royal treasury? What decides the value of an object? What does a pauper beg of? The answer is quite simple. (The answer is: money.)
हे चरणही एक प्रहेलिका आहे. कोशागारमध्ये काय असते? काय वस्तूचे मूल्य ठरवते? भिकारी काय मागतो? ह्यांचे उत्तर अगदी सरळ आहे. (उत्तर ~ पैसा .)
छायामयस्तर्हि खगाग्रमेघस्तेजस्वितां गूहति तां न पूर्णम् ।
सत्याग्रमब्रूत हि खल्वसत्यं सत्यं तदा गूहति तन्न पूर्णम् ।।७।।
Even though a cloud in front of the sun, casts a shadow, it cannot hide the brilliance of the sun entirely; even if falsehood is spoken in front of truth, it will not conceal the truth completely.
सुर्यासामोरील ढग जरी छाया देणारा असला तरी तो सूर्याची तेजस्विता पूर्णपणे लपवू शकत नाही. त्याचप्रमाणे सत्यापुढे जर असत्य म्हटले गेले तर ते असत्य सत्याला पूर्णपणे लपवू शकणार नाही.
करुणवीरशृङ्गारहास्याद्भुतभयानक- ।
बीभत्सशान्तरौद्राश्च भवन्त्येते रसाः नव ।।८।।
Mercy, bravery, love, humour, marvel, horror, detestation, peace and anger are the nine sentiments.
अहो बत खगादित्य क्वालस्यं त्वयि नैव ह ।
कर्मनिष्ठाद्दिने वारे प्रभाते प्रेरणां लभे ।।९।।
Oh my! Where within you, sun, can laziness be found? Seeing your diligence everyday, I remain motivated.
सूर्याप्ततेजभातार्कदिग्दर्शीतेजश्रेयद-।
विनीतोपकृतज्ञार्कादर्शशिष्यकलानिधिः ।।१०।।
The moon, who obtaining light from the sun shines; who shows the direction of the sun; who gives the credit of his own brilliance to the sun; is truly the grateful, humble and ideal disciple of his guru, the sun.
कविरनुवादकश्च - आदीत्य पुजारी
Poet and Translator - Aditya Pujari
