Talent without inspiration is as good as a pen without ink.
कार्यक्रम
एखादा कार्यक्रम आपण आयोजित केलेला असतो. या
कार्यक्रमाला बऱ्याच लोकांना बोलावण्यात आलेलं असतं. अर्थातच, तयारी
करायला आपण ठरलेल्या स्थळी थोडं आगोदर जातो. तयारी झाली की पाहुण्यांची
प्रतीक्षा सुरू.
काही वेळानं काही पाहुणे हजर झालेले असतात. त्यांच्याशी गप्पाटप्पा सुरू होतात. मग अजून चार पाहुणे आलेले दिसतात व त्यांचा स्वागत करायला आपण लगेच त्यांच्या जवळ जातो. आतापर्यंत जवळपास सगळे लोक आलेले असतात. पण अजून सगळे आलेत अस मनाला भासत नाही.
कोणीतरी
अद्याप आलेलं नाही असा लक्षात येतं. मग आपण विचारात पडतो.... कोण आलेलं
नाही? हा विचार आपल्याला शांत राहू देत नाही. फक्त एवढेच आले? असं वाटू
लागतं. काही वेळानं काही पाहुणे हजर झालेले असतात. त्यांच्याशी गप्पाटप्पा सुरू होतात. मग अजून चार पाहुणे आलेले दिसतात व त्यांचा स्वागत करायला आपण लगेच त्यांच्या जवळ जातो. आतापर्यंत जवळपास सगळे लोक आलेले असतात. पण अजून सगळे आलेत अस मनाला भासत नाही.
सकाळ
उषःकाल झाली. तांबडं फुटलं. पक्ष्यांची किलबिलाट सुरू झाली. अंधाराचा
अंत झाला. सकाळचं वातावरण काही आगळंच असतं. एक नवा दिवस म्हणजे जणू काही एक
नवीन जीवनच आहे, ज्याची सुरुवात होते उषःकालने. नवे चैतण्याचे प्रतीक
म्हणजे सकाळ. नव्या विचारांनी, नव्या संकल्पनेंनी, सकारात्मक मनाने सुरुवात
करण्यास प्रोत्साहन देते. रात्रीच्या काळोखाचा अंत होऊन जातो. कालच्या
घडामोडी विसरून जावा असे म्हणते. प्रकाश जसा अंधारावर मात करतो तसच आपणही
आपल्या अडचणींवर मात करू शकतो. असा संदेश सूर्योदय आपल्याला दररोज देत
असतो. याची जाण जर आपल्याला असेल तर आपण आपला दिवस सुदिन करू शकतो.
*दिशांतमुळे मिळालेल्या सुट्टीच्या दिवशी सकाळी ऐकू आलेली पक्ष्यांची किलबिलाट*
Subscribe to:
Comments (Atom)
