Powered By Blogger

सुप्रभात

उषःकाली नेहमीसारखाच आला होता रवि
पाहुनिया तयाकडे झाला प्रसन्न हा कवी
दिपवणाऱ्या तेजातून होता दोन मेघांचा प्रारंभ
पुसट विस्तारणाऱ्या ढगांना सजवला होता रंग
निळेभोर पांघरूण डोक्यावर पांघरलेले
दर्शन देत तिघे होते त्यात वसलेले
क्षितिज व दोन बंधू समांतर एकमेकांना
वाटेल जणू दुसऱ्यास त्या गाद्या ईश्वराच्या
आले होते भाऊ-भाऊ दोघे भास्कराच्या घरी
जणू वाटेल दुसऱ्यास गाद्या टाकत होता रवि
या शुभ्र भावांची भेट झाली होती कृपा देवाची
प्रेरणा मिळाली या कवीला प्रतिभा फुलवण्याची!