Powered By Blogger

मंत्रशक्ती

या जगातले कोणतेही कार्य आत्मविश्वासाने आणि चिकाटीने साध्य होऊ शकते, फक्त या गुणांना जागे करण्याचे माध्यम अनेक असतात. आपल्या संस्कृतीत 'मंत्र' हे एक रामबाण माध्यम आहे. मंत्र उच्चारल्याने आपल्या मनी आत्मविश्वास येतो. मंत्र म्हणून आपले काम पूर्ण होणार आहे या शाश्वतीने आपला या मंत्रावर विश्वास असतो नि याच विश्वासाने आत्मविश्वास निर्माण होतो, ज्याच्याने आपले काम पूर्ण होते. जेव्हा या मंत्राचा प्रभाव आपल्या जीवनात हळूहळू दिसू लागतो तेव्हा ह्या आत्मविश्वासाबरोबरच आपली देवावरची श्रद्धाही वाढते. ही श्रद्धा म्हणजेच मंत्रशक्तीमागची किमया होय.