"तुमच्या
वर्गातला सर्वात शिस्तीत मुलगा कोण आहे?" असं टिचरांनी विचारल्यावर सर्व
माझ्याकडे पाहू लागले. आमच्या वर्गाचा drawingचा तास होता, पण टिचरांच्या
मनात drawing व्यतिरिक्त काहीतरी वेगळेच ठरले होते.
त्यांनी आम्हाला काही प्रश्न विचारले, "तुम्ही दररोज आभ्यास करता का? किती मार्क पडतात परीक्षेत?"
अर्थातच, बेशिस्तीत मुलाकडून जे उत्तर अपेक्षित होतं तेच त्याच्या तोंडून ऐकले गेले. अभ्यासाकडे कमी लक्ष, मार्कही कमी. आणि जे उत्तर शिस्तीत मुलाकडून अपेक्षित होतं तेच उत्तर कानावर पडले. दररोज घरी गेल्यावर आभ्यास होतो नि मार्कही चांगले पडतात.
"त्रेचाळीस मुलांपैकी फक्त एकाच मुलाला कळलय मला काय सांगायचं होतं. मग बाकीच्या मुलांचं काय? आज मला आनंद होतोय, जे मी तुम्हा सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करत होते ते किमान एका मुलाला तरी कळलय." असं म्हणून त्यांनी आम्हाला पुढच्या तासाला सोडलं.
