Powered By Blogger

कांदे पोहे

आयुष्य हे, चुलीवरच्या, कढईतले, कांदे पोहे.
पोहे नीट भिजवले, तरच काम पुढचे होई,
नाहीतर चावण्यास सोपे नाही असे लक्षात येई.
हळद घातली नाही तर येणार नाही रंग,
राहिले नाही नाव, जर कांदा नाही त्या संग.
मिरची शिवाय खायला येणार नाही मजा,
मीठ नाही, तर जिभेला सजा.
हे सर्व केले नाही तर बिघडतील पोहे
आयुष्यही असेच आहे लक्षात ठेवा सर्वे.
आयुष्य हे, चुलीवरच्या, कढईतले, कांदे पोह.