बाळ जिथे स्मित तिथे
वातावरणास उल्हासित करे
मानव जिथे चिंता तिथे
वातावरणात ताण आणे
बाळ जिथे एकोपा तिथे
वात्सल्याची विण गुंफे
मानव जिथे जाती तिथे
उच्चनीचता उदंड असे
बाळ जिथे काळजी तिथे
परहितचिंतन शिकवे
मानव जिथे असूया तिथे
अहमहमिकेत मग्न सर्वे
बाळ जिथे प्रेम तिथे
या प्रेमास पक्ष ठाऊक नसे
मानव जिथे वैरी तिथे
मतभेद तंटा चित्त जाळे
निष्पाप निरागस मन बाळाचे
जणू वाळवंटातला झरा
वाहू दे असाच अनंत प्रेमाने
नका करू प्रदूषित ह्याला !
वातावरणास उल्हासित करे
मानव जिथे चिंता तिथे
वातावरणात ताण आणे
बाळ जिथे एकोपा तिथे
वात्सल्याची विण गुंफे
मानव जिथे जाती तिथे
उच्चनीचता उदंड असे
बाळ जिथे काळजी तिथे
परहितचिंतन शिकवे
मानव जिथे असूया तिथे
अहमहमिकेत मग्न सर्वे
बाळ जिथे प्रेम तिथे
या प्रेमास पक्ष ठाऊक नसे
मानव जिथे वैरी तिथे
मतभेद तंटा चित्त जाळे
निष्पाप निरागस मन बाळाचे
जणू वाळवंटातला झरा
वाहू दे असाच अनंत प्रेमाने
नका करू प्रदूषित ह्याला !
