शाळेतल्या विद्यार्थ्यांची शिकण्याची पद्धत ही हमालवाल्याच्या कामासारखी
असते. मुले पाठ्य पुस्तकातील माहिती ओझे असल्यासारखे डोक्यावर घेतात आणि
परीक्षेच्या वेळेला ती उत्तरपत्रिकेत उतरवतात. ही शिकण्याची व मार्क
मिळवण्याची पद्धत बरोबर नाही. ह्याच्यानी नुसती माहिती मिळते, ज्ञान नाही
मिळत. ज्ञान मिळवायचे असेल तर प्रयोग करावे. प्रयोगातून निरीक्षण करून ज्या
गोष्टी आपणहून लक्षात येतात ते खरे ज्ञान. प्रयोगातूनच नवे तर आपल्या
दैनंदिन आयुष्यात जे आपण अनुभवतो त्यातूनही ज्ञान मिळते. आणि हे ज्ञान जे
मिळते ते आपण हमालवाल्यासारखे डोक्यावर घेत नाही पण मातीसारखे पाण्याच्या
रुपात सोशून घेतो.
*भूगोलाचा अभ्यास होईना*
